पश्चिम बंगालमध्ये अनेकदा हत्ती आणि माणूस यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो.
पश्चिम बंगालमधला मनुष्य आणि हत्तीमधला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. पश्चिम बंगालमधल्या महाकाल धाम परिसरात एका माणसानं रस्त्यावर आलेल्या हत्तीला सलाम ठोकायचा प्रयत्न केला. असं केल्यानं हत्ती आपल्याला काही करणार नाही, असा त्याला आत्मविश्वास होता. पण, हा आत्मविश्वास त्याला चांगलाच नडला आणि हत्तीनं या माणसाला काही कळायच्या आत आपल्या पायानं चिरडून टाकलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव सादिक रहमान असून तो या परिसरातील एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. रस्त्यावर आधीच वाहतुकीची कोंडी झाली होती, त्यातून जंगलातून हत्ती बाहेर आला. हत्तीला पाहताच अनेकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला पण सादिक मात्र तिथेच उभा राहिला, कहर म्हणजे हत्ती अगदी जवळ आला असतानाही तो हत्तीला सलाम ठोकून स्तब्ध उभा राहिला. पण, हत्तीनं मात्र त्याला पायाखाली चिरडू
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews